Marathitarka.com

38 वर्षांच्या वहिनीच्या प्रेमात पडला दीर, दोघांचं सूत जमलं पण शेवट…

38 वर्षांच्या वहिनीच्या प्रेमात पडला दीर, दोघांचं सूत जमलं पण शेवट…

अनेकांचे लग्न झाल्यानंतरही विवाहबाह्य संबंध असल्याचं पाहायला मिळतं. पती आणि पत्नी दोघांनी सात जन्माची साथ देण्याची शपथ घेतलेली असते. मात्र विवाहबाह्य संबंधातून गु-न्-हा-गा-रीच्या घटनाही समोर येतात. मात्र जेव्हा विवाहबाह्य संबंध जेव्हा समोर येतात तेव्हा अनेक संसार मोडलेले आपण पाहिले आहेत.

अशातच राजस्थानमधील श्रीगंगानगरच्या सुरतमध्ये वहिनी आणि दीराच्या प्रेमाचा भयानक अंत झाला आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा इतका वाईट अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आला आहे.सुरतगड परिसरात 20 वर्षांच्या दीराचं आणि 38 वर्षीय वहिनीचं सुत जुळतं. दोघांच्या प्रेमप्रकरणांबद्दल घरात माहिती होते, घरात यावरून जोरदार भांडण सुरू होतं.

दोघेही इतके वैतागून जातात आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतात. शनिवारी दोघे बाईकवरून निघून जातात आणि सूरतगड हनुमानगड रेल्वे ट्रॅकसमोर उडी मारत आपलं जीवन संपवतात.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतात.दोघांचेही मृतदेह सुरतगडच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले होते.

दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी रंगमहालचे सरपंच विजयसिंह, माजी सरपंच आस्करन यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, मृतांमधील 20 वर्षीय दीराचं नाव पृथ्वीराज मेघवाल आणि वहिनी सुनीता मनसाराम अशी मृतांची नावं आहेत. दोघांनीही आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Team Marathi Tarka