19 वर्षीय तरुणीशी केला 67 वर्षांच्या म्हताऱ्या माणसाने प्रेमविवाह,नंतर झाले असे…

हरियाणा येथील पलवल येथे सर्वांना हैराण करणारी घटना घडली आहे. एका 67 वर्षाच्या वृद्धाने अवघ्या 19 वर्षांच्या तरुणीसोबत लग्नगाठ बांधली असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी प्रेमविवाह केला असून आता यांनी कोर्टाकडे धक्कादायक मागणी केली आहे.
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण या वाक्याचं जागतं उदाहरण देणारी घटना म्हणजे हरियाणातील ही घटना आहे. 67 वर्षीय व्यक्तीचं आधी देखील लग्न झालं आहे. मात्र त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं असून त्याला सात मुलं देखील आहेत.
सातही मुलांची लग्न झाली आहेत. तसेच या व्यक्तीच्या नवीन पत्नीचं देखील पहिलं लग्न झालं आहे.संबंधित तरुणी ही 19 वर्षाची आहे. या तरुणीचा तिच्या गावातील एका व्यक्तीसोबत जमिनीचा वाद सुरु होता. यात संबंधित 67 वर्षीय वृद्ध तिला मदत करत होता.
यादरम्यान, दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. यानंतर दोघांचा प्रेमविवाह पार पडला. मात्र दोघांनीही कोर्टात याचिका दिली आहे.दरम्यान, दाम्पत्याने कोर्टात सुरक्षतेची मागणी करत याचिका दिली आहे. यानंतर कोर्टाने या प्रकरणाला गांभिर्याने घेत तरुणीला सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला आहे. तसेच व्यक्तीची माहिती मिळवण्याचं काम देखील पोलिसांना देण्यात आलं आहे.